Congress Meeting News : पुढच्या काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. राजकीय नेत्यांनी गाठीभेटी, बैठकांचा धडाका सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) देखील हालचालींना सुरुवात केलीय. आज विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात कॉंग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका (Congress Meeting) मुंबईत होणार आहेत.  प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या उपस्थितीत मुंबईच्या जागांसंदर्भात मविआच्या वाटाघाटी संदर्भात गठित केलेल्या मुंबई काँग्रेसच्या समितीची सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. 


दुपारी 12 वाजता  राज्यातील जगावाटपसंदर्भात बैठक होणार


दरम्यान, दुपारी 12 वाजता प्रदेश काँग्रेसच्या समितीची राज्यातील जगावाटपसंदर्भात बैठक होणार आहे. मुंबईतील हॉटेल लिलामध्ये बैठका होणार आहेत. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.


मुंबईच्या जगावाटपसंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची समिती 


मुंबईच्या जगावाटपसंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख हे मुंबईच्या जगावाटपसंदर्भात चर्चा करणार आहेत. तर राज्यातील जगावाटपसंदर्भात प्रदेशाध्य नाना पटोले,  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील चर्चा करणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


नाशिकमध्ये महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे गटाच्या 'त्या' ठरावावर काँग्रेस, शरद पवार गटाचा आक्षेप