एक्स्प्लोर

अधिवेशनादरम्यान नागपुरात गँगवॉर, कुख्यात गुंडांची हत्या

हिवाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवणारी आणखी एक घटना आज (मंगळवार) पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवणारी आणखी एक घटना आज (मंगळवार) पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. खरबी चौकाजवळच्या लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली आहे.  बादल शंभरकर आणि संजय बानोदे अशी या दोघांची नावं आहेत. तर तिसरा राजेश यादव गंभीर जखमी आहे. नागपुरातला तडीपार गुंड संजय बनोदे आणि फरार गुंड बादल शंभरकर या दोघांना प्रतिस्पर्धी मेश्राम टोळीच्या गुंडांनी पाठलाग करुन संपवलं.  आधी मोटरसायकलला स्विफ्ट कारने उडवलं आणि नंतर दोघांची निर्घृण हत्या केली. तडीपार आणि फरार असलेले गुंड नागपुरात नेमकं काय करत होते? ते नागपूर पोलिसांना का सापडले नाहीत? पोलिसांकडे या प्रश्नांची तर उत्तरे नाहीतच. पण हिवाळी अधिवेशन सुरु असताना आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना नागपुरात सुरु असलेल्या हत्याकांडांबद्दलही पोलिसांकडे काहीच उत्तर नाही. याच मुद्यावर आज विधानसभेतही आवाज उठवण्यात आला. पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी मात्र पोलिसांना पाठीशी घातलं. आकडे, टक्केवारी आणि सरासरी सांगून नागपूरचा क्राईम रेट कमी होणार नाही. त्यासाठी गृहमंत्र्यांना त्यांच्या खात्यावर आणखी लक्ष द्यावं लागेल. अन्यथा क्राईम सिटीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं नागपूर पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर

Embed widget