एक्स्प्लोर

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट; शिंदे, निरुपम यांचा विरोध

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई : एकीकडे राज्यात काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा आहेत. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांचा मात्र याला विरोध आहे. शिवसेना आणि काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. तसंच दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चेची आपल्याला माहिती नाही, असंही शिंदे म्हणाले. तर काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा काय करु शकतात, असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन रस्सीखेच सुरु असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ही संधी साधण्याची तयारी करत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मदतीचा हात पुढे केला आहे. काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहे. ज्यात सत्ता स्थापनेच्या संभाव्य हालचालींवर चर्चा होईल. आता दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. जाती-धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार नाही : शिंदे राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे फ्रॅक्चर्ड मॅनडेट आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणत्याही धर्म आणि जातीवर राजकारण करणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते दिल्लीला का गेले हे मला माहित नाही. आम्ही जनतेचा कौल मान्य करुन विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करायला तयार आहोत. सोनिया गांधींशी माझी चर्चा झालेली नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. मला पक्ष श्रेष्ठींनी विचारलं तर त्यांना मी कळवेन," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. भाजप-शिवसेनेच्या भांडणाला बळी पडू नका : निरुपम "भाजप शिवसेनेचा तात्पुरता वाद केवळ सत्तेसाठी आहे. नंतर ते पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसने पडू नये. सत्तेत आल्यानंतर ते परत एकत्र येतील आणि आम्हाला शिव्या घालतील. काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करु शकतात?" असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget