एक्स्प्लोर
औरंगाबादेत प्रेम प्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या
संकेत जयभायेचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र ती तरुणी संकेत कुलकर्णी याच्यासोबत का बोलते, याचा राग जायभायेच्या मनात होता. या कारणातून दोघांमध्ये वाद होत असत.

औरंगाबाद : औरंगाबादच्या कामगार चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. संकेत कुलकर्णीचा मृत्यू झाला असून शुभम डंख आणि विजय वाघ हे दोन तरुण जखमी झाले आहेत. मुलीशी संबंधित जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर पसार झालेला आरोपी संकेत जायभायेच्या मुसक्या पोलिसांनी काही तासातच आवळल्या. संकेत जयभायेचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र ती तरुणी संकेत कुलकर्णी याच्यासोबत का बोलते, याचा राग जायभायेच्या मनात होता. या कारणातून दोघांमध्ये वाद होत असत. संकेत जयभाये याने शुक्रवारी संकेत कुलकर्णी याला कामगार चौकात बोलावलं. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. संकेत कुलकर्णी पुढे जात असताना आरोपी संकेतने त्याच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये संकेतचा मृत्यू झाला. संकेत कुलकर्णी हा मूळचा परभणी जिल्यातील पाथरीचा होता. नुकताच तो पुण्याहून बारावीची परीक्षा देऊन परत आला होता. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणातील चारचाकी गाडी ताब्यात घेतली आहे. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काहीच दिवसांपूर्वी पुण्यात प्रेमप्रकरणातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या झाली होती. तरुणांमधील वाढत्या हिंसेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















