शिर्डी : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. महिलांचा अपमान केल्याबाबत इंदोरीकरांनी जाहीर माफी मागावी मागणी देसाईंनी केली आहे. दहा दिवसात जाहीर माफी त्यांनी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदोरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही. तसेच अशी वक्तव्य मी पुढे कीर्तनात करणार नाही, असं कोणत्याही पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केलेले नाही. त्यांच्यावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझी बदनामी आणि चारित्र्यहनन गेले आठ दिवस सुरु आहे, जीवे मारण्याच्या धमक्याही मला येत आहेत, असं तृप्ती देसाईंनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.


याबाबतीत त्यांनी तातडीने सर्व महिलांची जाहीर माफी मागावी आणि अशी वक्तव्य यापुढे करणार नाही, असं जाहीर करावे. यासाठी वकिलामार्फत तृप्ती देसाई यांनी नोटीस पाठवलेली आहे. ॲड. मिलिंद पवार, पुणे यांच्या माध्यमातून ही नोटीस इंदोरीकर यांच्या पत्त्यावर पाठवली असून दहा दिवसात जाहीर माफी त्यांनी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणतात...



इंदोरीकर महाराज वाद 


गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका वक्तव्यावरुन कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर वादात आहेत. आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली होते. वादानंतर त्यांनी पत्रक जारी करुन दिलगिरीही व्यक्त केली होती.


इंदोरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल


निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले?


'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'


Majha Vishesh | इंदोरीकर महाराजांना टार्गेट केलं जातंय? | ABP Majha



संबंधित बातम्या :