पुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रसिला ओपी हत्या प्रकरणातील आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी भाबेन सैकियाला शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन जात असताना मंगळवारी हा प्रकार घडला.
इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?
मूळची केरळची असणारी 23 वर्षीय रसिला राजू ओपीची हिंजवडीमधील इन्फोसिसच्या आवारातच 29 जानेवारी रोजी गळा आवळून हत्या झाली होती. ‘एक टक का बघतोस,’असा जाब विचारल्याच्या रागातून रसिलाची हत्या झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सुरक्षारक्षक भाबेन सैल्कियाला पोलिसांनी अटक केली आहे.
रसिलाच्या हत्येमागे वरिष्ठांचा हात असू शकतो : वडिलांचा दावा
पोलिसांनी आरोपी भाबेन सैल्कियाला शिवाजीनगर न्यायालायात सुनावणीसाठी आणलं होतं. त्यावेळी तृप्ती देसाई आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच भाबेनला गाडीत बसवून नेलं. त्यानंतर तृप्ती देसाईंनी पोलिसांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न केला.
'एक टक का बघतोस,' जाब विचारल्याने इन्फोसिसच्या इंजिनिअरची हत्या
दरम्यान, आरोपीला कोर्ट परिसरात मारहाणीचा प्रयत्न आणि पोलिसांची गाडी अडवल्याप्रकरणी तृप्ती देसाईंसह तीन महिलांवर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडीत महिला आयटी इंजिनिअरची हत्या, सुरक्षारक्षक ताब्यात