Compensation for Accident : मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एका 39 वर्षीय महिलेला आणि तिच्या दोन मुलांना 1.49 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिले आहेत. मे 2018 मध्ये पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर महिलेच्या पतीच्या कारचा अपघात झाला. बस आणि कारच्या अपघातात महिलेने तिचा पती गमावला होता. अपघातातील बस नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची होती. पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेने नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती.


रस्ते अपघातातील बळीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई


न्यायाधिकरणाने आता नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स (Neeta Tours and Travels) आणि विमा कंपनी (Insurance Company) द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. (The New India Assurance Co. Ltd.) यांना दावेदारांना 7 टक्के वार्षिक व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहे. दोन महिन्यांत याचिका दाखल करण्याच्या दोन महिन्यांमध्ये पीडितेला भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने 6 जून रोजी हा आदेश जारी केला, त्याची प्रत बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली.


1.49 कोटी रुपये भरपाई देण्याचे निर्देश


न्यायाधिकरणाने विमा कंपनीला प्रथम नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्या शुभ्रा श्रीवास्तव आणि त्यांची मुले पुण्यातील हिंजवडी येथील रहिवासी आहेत. याचिकाकर्त्यांचे वकील आर.सी. यादव यांनी कोर्टाला माहिती दिली की, मृत सौरभ श्रीवास्तव (त्यावेळचे वय 35) हे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, इंटिग्रेटेड ऍक्सेस लीड (IANI) म्हणून काम करत होते. 


कसा घडला अपघात?


21 मे 2018 रोजी एका खाजगी बसने त्यांच्या कारला धडक दिली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दिलेल्या धडकेत सौरभ श्रीवास्तव जखमी झाले. कारला जोरदार आघात झाल्याने आतमध्ये बसलेल्या श्रीवास्तव यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 


ट्रव्हल्स कंपनीकडून कुणी सुनावणीवेळी उपस्थित नव्हतं. तर, विमा कंपनीचे (Insurance company) वकील पीबी नायर यांनी दावा केला की, याचिकाकर्त्यांनी नुकसानभरपाई म्हणून मागितलेली दाव्याची रक्कम जास्त होती आणि दावा कायम ठेवता येत नाही. शवविच्छेदन अहवाल वाहन अपघातात मृत व्यक्तीच्या मृत्यूमागचं कारण मानण्यासाठी पुरेसं आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. 



  •  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Baba Ramdev : बाबा रामदेव यांनी चालवली महागडी कार! किंमत ऐकून व्हाल चकित; व्हिडीओ व्हायरल