Baba Ramdev Laxury Car : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ अनेक वेळा व्हायरल होत असतात, तर कधी वक्तव्ये चर्चेत असतात. सध्या बाबा रामदेव एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


बाबा रामदेव अन् महागडी कार


या व्हिडीओमध्ये ते महागडी आलिशान कार चालवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रचंड चर्चेतही आहे. अनेक यूजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याच कारण म्हणजे बाबा रामदेव जी आलिशान कार चालवत आहेत त्याची किंमत कोट्यवधी असल्याचं सांगण्यात येत आहे.


बाबा रामदेव यांनी चालवली महागडी कार


बाबा रामदेव यांचा नवीन लँड रोव्हर कार चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव लँड रोव्हर डिफेंडर 130 (Land Rover Defender 130) कार चालवताना  दिसत आहेत. ही कार कंपनीने नुकतीच लाँच केली आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडमधील हरिद्वारमधील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. 


पाहा व्हायरल व्हिडीओ :






कारची किंमत ऐकून व्हाल चकित 


याआधीही बाबा रामदेव आलिशान कार चालवताना दिसले आहेत. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव लँड रोव्हर डिफेंडर 130 कार चालवताना दिसत आहेत. ही एक लक्झरी कार आहे, जी आधुनिक सोयी आणि डिझाइनसह तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स आहेत, ज्यामुळे गाडी चालवताना आरामदायी प्रवास करता येतो. ही कार भारतात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आली होती. या कारची किंमत 1.41 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाबा रामदेव स्वतः ही आलिशान कार चालवत आहेत, तर त्यांच्यासोबत काही लोक कारमध्ये बसले आहेत.


 


 


व्हायरल व्हिडीओमध्ये बाबा रामदेव गाडी चालवत आहेत. मात्र, जी कार बाबा रामदेव चालवत आहेत की त्यांनी खरेदी केली आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. बाबा रामदेव व्हिडीओमध्ये जी 'लँड रोव्हर डिफेंडर 130' गाडी चालवताना दिसत आहेत, ती कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लाँच केली आहे आणि अलीकडेच या कारची डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे.