Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील एका खाजगी शाळेकडून विद्यार्थ्यांनी टिळा,गंध लावून येण्यास मनाई करण्यात आली असून, तसे लेखी पत्र पालकांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक यांनी माफीनामा लिहून दिल्याने हा विषय मिटला. बिडकीन गावातील हा सर्व प्रकार आहे. 


पैठणच्या बिडकीन गावात महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल आहे. या ठिकाणी प्री प्रायमरीपासून ते जुनिअर कॉलेजपर्यंत इथे वर्ग आहे. दरम्यान, मंगळवारी (25 जुलै) रोजी शाळा प्रशासनाकडून पालकांना एक पत्र पाठवण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांना स्वच्छते सहीत निटनेटकेपणाने शाळेत पाठविणे बाबत सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान, याच सूचना करतांना विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे मुलांना कपाळावर कोणत्याही प्रकारचा टिका, रंग, गंध, लावून शाळेत पाठवु नयेत. तसेच हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नये, हातात घडयाळ, स्मार्ट वॉच घालून पाठवू नये, विद्यार्थ्यांच्या कानात कोणत्याही प्रकारच्या बाळया नसाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. 


मुलांना शाळेत पाठवताना कोणत्याही प्रकारचा कपाळावर टिका, रंग, गंध आणि हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नयेत अशा सूचना करण्यात आल्याने यावरून मराठा क्रांती मोर्च्याचा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, पालकांसह मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते आज थेट महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलमध्ये पोहचले. यावेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. तर असे कोणतेही नियम आम्ही मुलांवर बंधनकारक केले नसून, फक्त त्याबाबत आवाहन केले असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली. तर शाळा प्रशासनाने काढलेलं पत्र मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि पालकांनी केली आहे. 


पालकांमध्ये रोष... 


संबंधित शाळेने मुलांना शाळेत पाठवताना कपाळावर टिका, रंग, गंध न लावण्याचे पत्र काढले काढल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पालकांनी शाळेत जाऊन याबाबत विचारणा केली. तसेच मुलांनी गंध लावल्याने शाळेला काय अडचण आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तसेच ही आपली संस्कृती असून, याला शाळेचा विरोध कशासाठी असा सवाल शाळेच्या शिक्षकांना पालकांनी विचारला. मात्र, पत्रात फक्त सूचना करण्यात आल्या असून, त्या बंधनकारक नसल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बहिणीला पळवून नेल्याचा जाब विचारल्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार; औरंगाबादच्या वाळूज भागातील घटना


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI