Coronavirus | पुण्यातील दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु; नागरिकांनी घाबरू नये, सतर्क राहावे : राजेश टोपे
पुण्यातील कोरोना संशयित दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत.

मुंबई : कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आले आहेत. दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, अशी सतर्कता बाळगावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केले आहे.
कोरोनाच्या संशयित रुग्णावर लक्षणांवर आधारित उपचार केले जात असून केरळ येथेही तीन रुग्ण आढळून आले होते त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नमुने पुन्हा निगेटीव्ह आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Coronvirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात
पुण्यातील एक दाम्पत्य 1 मार्च रोजी दुबईवरुन पुण्यात आले होते. एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत ते दुबईला पर्यटनासाठी गेले होते. दुबईतून पुण्यात आले त्यावेळी त्या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मात्र घरी गेल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने हे दाम्पत्य तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये पोहचले. या दोघांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघांबरोबर जे 40 जण त्यांच्यासोबत होते, त्यापैकी कोणाच्याच टेस्ट करण्यात आल्या नाहीत, असं स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे.
मात्र आता हे पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या इतर 40 जणांच्याही टेस्ट कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले हे दाम्पत्य मागील आठ दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील अशा सर्वांचा शोध घ्यावा लागणार असल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
महत्त्वाच्या बातम्या






















