मुंबई : माहिम येथील फॅमिली केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर कोव्हिड पॉझिटिव्ह नसताना देखील कोव्हिडचे उपचार करण्यात आले. या उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या नातेवाइकांची आपल्या रुग्णाचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला असून रुग्णालयाने आपली आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप केला आहे. आज सकाळी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील या रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आणला आहे.


माहीम इथं फॅमिली केअर सेंटर हे हॉस्पिटल असून सध्या हे कोव्हिड सेंटर करण्यात आलेले आहे. या रुग्णालयात 32 रुग्णांना अॅडमिट करण्याची सुविधा आहे. माहीम कोळीवाडा इथला प्रशांत काळे हा तरुण 25 जुलैला तिथल्या एका स्थानिक रुग्णालयात केसतोडीवर उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. यावेळी या फॅमिली केअर सेंटर रुग्णालयातील डॉक्टर किरण पाटील हे या रुग्णालयात आले होते. त्यांनी रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यांना तातडीने आपल्या रुग्णालयात म्हणजेच फॅमिली केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करा असा सल्लाही त्यांनी दिला होता.


यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी घाबरून तातडीने या सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. हा रुग्ण केवळ दहा तास या सेंटर मध्ये उपचार घेत होता. यावेळी डॉक्टर्स आणि तिथल्या स्टाफने त्यांना कोव्हिडं झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार करावे लागत असल्याची माहिती दिली. पण कोव्हिडं पॉझिटिव्ह रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना औषधे उपलब्ध होत नव्हती. यावेळी रुग्णालयाने दुसऱ्याच रुग्णाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि आधारकार्ड या रुग्णांच्या नावावर जोडून मीरा रोड येथून औषध नातेवाईकांना घेऊन येण्यास सांगितले. रुग्णावर covid-19 उपचार सुरू झाले आणि दहा तासातच हा रुग्ण दगावला. त्यानंतर या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नातेवाईक अधिकच संतापले.


या रुग्णालयात कोव्हिडं सेंटर असूनही रुग्णांची विशेष काळजी घेत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेला आहे. तर पूर्णक्षमतेने डॉक्टर्स, नर्सेस , मेडिकल स्टाफ नसल्यामुळे इथल्या रुग्णांचे जीवन हे रामभरोसे आहे , असाही आरोप केलाय. या रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार होत नसून त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची माहिती या परिसरातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या वेळी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात या हॉस्पिटलकडे धाव घेतली. रुग्णांच्या नातेवाइकांनी या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कारभाराची पोलखोल केली. हे हॉस्पिटल त्वरीत बंद करावं अशी मागणी देखील केली. यावेळी नातेवाईकांनी जोरदार घोषणाबाजी करत डॉक्टरांनी बाहेर येऊन उत्तर देण्याची मागणी केली. मात्र रूग्णालयात एकही सक्षम जबाबदार डॉक्टर्स नसल्यामुळे पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवावं लागलं. हे हॉस्पिटल कोव्हिडं साठी सक्षम नसताना देखील महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयाला का परवानगी दिली अशी विचारणा होत आहे.


या रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक तर होत आहेच , मात्र रुग्णांवर उपचार करण्यासाठी सक्षम वैदकीय अधिकारी उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही या हॉस्पिटलबाबत महापालिकेकडे तक्रारी गेलेल्या आहेत. मात्र महापालिकेचे अधिकारीही या हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी कुचराई करत असल्याचेही आरोप या वेळी करण्यात आलेली आहेत.


प्रतिक्रिया


किरण धनु (मयताचे नातेवाईक )


मयत प्रशांत काळे हे माझे दाजी आहेत. त्यांना केस्तुड उठल्यामुळे एका रुग्णालयात उपचारासाठी आम्ही दाखल केलं होतं. मात्र आम्हाला चुकीची माहिती देऊन डॉ. किरण पाटील यांनी फॅमिली केअर सेंटरमध्ये दाखल करायला भाग पडलं. कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने औषध उपचार करण्यात आले. यात त्यांचा मृत्यू झाला आणि कोरोना पॉझिटिव्ह मृत व्यक्तींवर ज्या पद्धतीने अंत्यविधी करण्यात येतो त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर अंत्यविधी केले. आता त्यांचा रिपोर्ट आमच्याकडे आला , तो रिपोर्ट निगेटिव्ह आहे. मग हॉस्पिटलने आम्हाला खोटी माहिती का दिली ? आमच्या कडून अडीच लाख रुपये बिलाची रक्कम हॉस्पिटलने वसूल केलेली आहे. प्रशांत काळे यांचा मृत्यू नसून त्यांचा या हॉस्पिटलने खूनच केलेला आहे. असा आमचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.


अक्षता तेंडुलकर ( स्थानिक भाजप नेत्या)


32 वर्षे प्रशांत यांचा मृत्यू रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची माहिती आम्हाला कळाली. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात जाब विचारण्यासाठी आलो असता एकही सक्षम वैद्यकीय अधिकारी आमच्या समोर आले नाहीत. सर्वच पळून गेले होते. रुग्णालयाची आम्ही पाहणी केली असता हे रुग्णालय रामभरोसे सुरू आहे अशी अवस्था आहे. कारण रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकही सक्षम वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत. केवळ प्रायव्हेट नर्स च्या आधारावर हे रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयातील इतर रुग्णांची देखील आर्थिक पिळवणूक सुरू असल्याची तक्रार या रुग्णांच्या नातेवाइकांनी आमच्याकडे केलेली आहे. यासंदर्भात आम्ही रीतसर माहीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


Covid Warriors|कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राईट टू रेकग्नाईज वेबसाईटची निर्मिती