मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळाला दोन हजार साध्या (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी शासनाने सुमारे सहाशे कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न् झालेल्या एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.


मागील वर्षी शासनाने 700 साध्या बसेस (500 लालपरी, 200 विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने 186 कोटीची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी शासनाने 110 कोटी एसटी महामंडळास दिले आहेत. या 700 बसेस एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झाल्या आहेत.

Explainer Video | एसटी महामंडळ कसे अडचणीत आले? | ABP Majha



गाव ते तालुका, गाव ते जिल्हा अशा सुमारे 60 कि.मी.च्या परिघामध्ये एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवासी संख्येपैकी तब्बल 90 टक्के प्रवासी या परिघामध्येच प्रवास करतात. या प्रवासीवर्गाला एसटीची लालपरी म्हणजेच साधी परिवर्तन बस अविरत सेवा देत आहे. या सेवेचा दर्जा आणखीन उंचावण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने दोन हजार साध्या परिवर्तन( लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव एसटी महामंडळाने शासनाला सादर केला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.

संबंधित बातम्या :

व्हेंटिलेटरवर असलेल्या एसटी महामंडळाच्या मदतीला धावले हायकोर्ट, राज्य सरकारला तंबी

मार्गात खोळंबलेल्या बसमधील प्रवाशांना मूळ तिकीटावर उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येणार