Beed news update : बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू आज विवाह बंधनात अडकले आहेत. बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे बाळू आणि तृतीयपंथी सपना आजपासून आयुष्यभरासाठी सोबती बनले आहेत.

  
 
पारंपारिक धार्मिक विधीनुसार सपना आणि बाळूचा विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण मंगलाष्टिका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील लोकांनी सपनाचं कन्यादान केलं. 


काल सपनाच्या घरी धार्मिक परंपरेनुसार हळदीचा सोहळा उत्साहात पार पडला. या हाळदीच्या सोहळ्यासाठी सपनाच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. याच मंडपात चौक भरला आणि या चौकावर सपना आणि बाळूला हळद लावण्यात आली होती.  


काल सपनाला लागली हळद
सपना आणि बाळूच्या प्रेम कहाणीचे राज्यभरातून कौतुक होत आहे. दोन वर्षांच्या प्रेमकहाणीनंतर सपना आणि बाळूने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सपनाने तिच्या आयुष्यामध्ये कधीही तिला हळद लागेल असं स्वप्न बघितलं नव्हतं. परंतु, बाळूच्या साथीने काल सपनाला हळद लागली आणि आज ती बहोल्यावर चढली. आज सकाळी साडेअकरा वाजता बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात सपना- बाळू विवाह बंधनात अडकले आहेत. 


सपना-बाळूची प्रेमकहाणी
बाळू आणि सपनाची प्रेमकहाणी संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी सुरू झाली. ही प्रेमकहाणी सत्यात उतरत उद्या सपना आणि बाळू आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या


PHOTO: तृतीयपंथी सपना बाळूसोबत अडकली विवाह बंधनात


Transgender Wedding : बीडचा तरूण तृतीयपंथीयाशी बांधणार लग्नगाठ! सपना-बाळूची अनोखी प्रेमकहाणी


अन् तृतीयपंथी सपनाला हळद लागली! बीडमधील बाळूशी उद्या लगीनगाठ, भन्नाट लव्हस्टोरी...


तृतीयपंथी सपनाला लागली हळद! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बीडमधील कंकालेश्वर मंदिरात बाळूशी बांधणार लगीनगाठ