Bacchu Kadu : न्यायाधीशांचा मान हा किती दिवस ठेवायचा? असं वक्तव्य शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतला फ्लॅट लपवल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यावर बोलताना बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलं आहे. न्यायधिशाने दिलेला निर्णय 100 टक्के बरोबर आहे की चुकीचा आहे. पण आम्ही न्यायधीशाचा मान राखतो असे कडू यावेळी म्हणाले. पण मान किती ठेवायचा हा प्रश्न असल्याचे कडू यावेळी म्हणाले.


दरम्यान, आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, या शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अलीकडेच त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर दिले. निवडणूक शपथपत्रात त्यांच्याकडे असलेल्या मुंबईतील फ्लॅट लपविल्याप्रकरणी अमरावतीतील न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर बच्चू कडू संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयाने दिलेल्या निकालावर व न्यायधीशाचा मान किती दिवस ठेवायचा अस म्हणून पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे. काल ते बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे नगरपंचायतीच्या कार्यक्रमात आले असता, त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.


प्रकरण नेमकं काय?


2014 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांनी मुंबईतील आपल्या फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती


2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून निवडणूक लढतेवेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबई येथील त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती. त्यामुळे या विरोधात चांदूरबाजार भाजपचे गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू विरोधात 27 डिसेंबर 2017 रोजी चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, यात तब्बल पाच वर्षा नंतर चांदुरबाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल देत त्यांना 2 महिने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड दिला आहे, तर बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिल्याने त्यांच विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या: