Marathi Board on shops: राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी घेतलाय. राज्य सरकारच्या आदेशात अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ज्या दुकानात कामगार संख्या किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आलंय. राज्य सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. मात्र, व्यापारी संघटनानं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. 


फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा म्हणाले की, "दुकानांच्या फलकावर मराठी शब्द लिहिण्यास हरकत नाही. मात्र, दुकानाच्या फलकावर मराठी नाव लावताना फॉन्टचा आकार अधिक असावा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात दुकानांच्या फलकांवर मराठी शब्द असावेत, असं म्हटलं होतं. दुकानांमध्ये मराठी नावे लिहिण्यास आमचा विरोध नाही. परंतु मराठी नावे देताना फॉन्ट्सबाबत निर्णय घेतला जात आहे".


दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017' हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha