ट्रॅक्टर नाल्यात उलटून भीषण अपघात; 7 जण ठार तर 25 जखमी
खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ट्रॅक्टर नाल्यात उलटून भीषण अपघात झाला असून अपघातात 7 जण ठार तर 25 जण जखमी झाले आहेत.

बेळगाव : खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ट्रॅक्टर नाल्यात उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जण जागीच ठार झाले आहेत. तर पंचवीसहून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बोगुर गावातील ऊस तोडणी कामगारांना घेऊन ट्रॅक्टर जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टर वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरने नाल्याच्या संरक्षक भिंतीला धडक दिली आणि ट्रॅक्टर खाली कोसळला. यावेळी झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार झाले असून 25 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. चालकाच्या बेजबाबदार पणामुळे अपघात घडल्याचं बोललं जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याला सुरुवात केली. अपघातातील जखमींना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या






















