एक्स्प्लोर

नितीन गडकरी 4 थ्या नंबरवर, नरेंद्र मोदींसह मंत्रिपदाची शपथ घेणारे टॉप 20 खासदार, जे.पी.नड्डांनाही स्थान

पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्य क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली.

नवी दिल्ली  : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी (Narendra modi) आज तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजधानी दिल्लीतील (Delhi) राष्ट्रपती भवन परिसरात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी जमला होती. विशेष म्हणजे देशात एनडीएचं सरकार आल्यापासून विविध देशातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटरवरुन अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, आजच्या शपथविधी सोहळ्यासही अनेक परदेशी पाहुणे हजर होते. मै नरेंद्र दामोदारदास मोदी... ईश्वर साक्ष शपथ लेता हूँ की, विधिद्वारे स्थापित सच्ची श्रद्धा और निष्ठा से काम करुंगा, असे म्हणत मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रीक केली. 

पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते, तर राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते. नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. त्यामुळे, मोदी 3.0 सराकरमध्ये गृह आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर, रजीनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गज दिसून आले. दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी 3.0 मध्ये एकूण 20 नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये हे नेते सहभागी झाले नव्हते. यावरून त्यांचा यावेळी मोदी मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वप्रथम शपथ घेणारे पहिले 20 मंत्री

1.नरेंद्र दामोदरदास मोदी
2.राजनाथ सिंह
3.अमित शाह
4. नितीन गडकरी
5. जगतप्रकाश नड्डा
6.शिवराजसिंह चौहान
7.निर्मला सितारमण
8.एस. जयशंकर
9.मनोहरलाल खट्टर
10. एच.डी. कुमार स्वामी
11. पियुष गोयल
12.धमेंद्र प्रधान
13.जितनराम मांझी
14. ललनसिंग - जनता दल (नितीश कुमार)
15. सर्वानंद सोनोवाल - आसाम (भाजप)
16.डॉ. विरेंद्र कुमार - मध्य प्रदेश (भाजप)
17. किंजरापूरा नायडू
18. प्रल्हाद जोशी - मध्य प्रदेश (भाजप)
19. जुएल ओराम
20. गिरीराज सिंह

हेही वाचा

PM Narendra Modi :'मी नरेंद्र दामोदरदास मोदी...' मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ; पाहा फोटो

Narendra Modi : मै नरेंद्र दामोदरदास मोदी... तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ग्रँड सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?
Supreme Court On Election : स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच, कोर्टाची पुढील सुनावणी शुक्रवारी
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : खूप आठवण येत असेल तर भेटायला जा, धनंजय मुंडेंना सल्ला
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Embed widget