दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्फोटकसदृश वस्तू सापडल्यानं खळबळ, वेळीच कारवाई केल्यानं मोठा अनर्थ टळला
2. सलग दुसऱ्या दिवशी एनआयएची डी कंपनीविरोधातील कारवाई सुरु, काल ताब्यात घेतलेल्या सोहेल खंडवानीचे नवाब मलिकांशी व्यवहार झालेत का याचा तपास करणार
3. नवनीत राणांच्या उपचाराच्या व्हायरल फोटोमुळं लीलावती रुग्णालय अडचणीत, शिवसेना नेते आज पोलिसांत तक्रार करणार, तर अहवालासाठी पालिका आयुक्तांकडून 48 तासांचा अल्टिमेटम
4. महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींची सत्र न्यायालयात धाव, अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
5. जून-जुलैमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता, लसीकरण वाढवण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 10 मे 2022 : मंगळवार
6. बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत लागणार, दहावी-बारावीच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण, बोर्डाची माहिती
7. मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष, तर काल मुख्यमंत्र्यांची राज्य निवडणूक आयोगाबरोबर खलबतं
8. पंजाबच्या मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट, रॉकेट हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती, सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान
पंजाबमधील मोहालीत पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. सोमवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या रॉकेट हल्ल्यानं संपूर्ण पंजाब हादरलं. या रॉकेट हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनीही चौकशी सुरु केली आहे. अचानक झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर मोहालीत आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा रॉकेट हल्ला म्हणजे, दहशतवादी कट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सध्या मोहालीचे एसपी (मुख्यालय) रविंदर पाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या रॉकेट हल्ल्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, हा दहशतवादी हल्ला आहे असं म्हणता येईल का? असं विचारल्यावर ते म्हणाले की, या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. रविंदर यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झालं आहे की, हा रॉकेट हल्ला म्हणजे, दहशतवादी कट असण्याची शक्यता समोर ठेवूनच पोलीस तपास करत आहेत.
9. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर अराजकता.. बुधवारपर्यंत संचारबंदी, हिंसक जमावाकडून माजी मंत्री जॉन्स्टन फर्नांडोचं घर पेटवलं
10. एचडीएफसी, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा आणि करूर वैश्य या बँकांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ, आरबीआयनं रेपो दरात वाढ केल्यानं सर्व प्रकारची कर्ज महागली