दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर आज राज्यात खलबतं, राज्य सरकार आणि निवडणुक आयोगासमोरील पर्यायांची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक


2. जामीन मंजूर झाल्यानंतर राणा दाम्पत्य 12 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार, राणांना माध्यमांशी बोलण्यास न्यायालयाचा मज्जाव, मुंबई पालिकेचं पथक आज पुन्हा राणांच्या घरी जाण्याची शक्यता


राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. दरम्यान, आज त्यांची तुरुंगात सुटका होऊ शकते. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते किरीट सोमय्या खार येथील निवास्थानी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


3. राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांची सामंजस्याची भूमिका, मुंबई, नाशिकमध्ये पहटेच्या अजानसाठी भोंगा नाही, तर शिर्डीच्या साईमंदिरात काकड आरती भोंग्यांविना होणार


4. राज ठाकरेंच्या निवासस्थानावरून पोलिसांना गुंगारा देत पळून जाणाऱ्या संदीप देशपांडेंचा पोलिसांकडून शोध, तर कुणालाही धक्काबुक्की केली नाही, व्हिडीओ जारी करत संदीप देशपांडेंचा दावा


5. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सबळ पुराव्या अभावी संभाजी भिडेंचं नाव गुन्ह्यातून वगळलं, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज जबाब नोंदवण्यासाठी आयोगापुढे जाणार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 05 मे 2022 : गुरुवार



6. ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा, माजी नगरसेविका राजश्री फाटक आणि  विकास रेपाळे यांची भर रस्त्यात हाणामारी, व्हीडिओ व्हायरल


7. सांगलीच्या आयर्विन पुलावर टेम्पो-कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तर 11 जखमी 


8. आंब्यांच्या मागणीत 60 टक्क्यांची वाढ, राजस्थान, गुजरात, दिल्लीसह यूपीमध्ये निर्यात, विजयवाडातील व्यापाऱ्यांची माहिती


9. निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या राजकीय वाटचालीचं रणशिंग फुंकणार, आजच्या पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता


10. रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना झटका, वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट दरात वाढ, गृह कर्ज, वाहन कर्ज महागणार, 21 मेपासून नवे दर लागू होणार