Loudspeaker Controversy : महाराष्ट्रात हनुमान चालीसा तसेच लाऊडस्पीकरचा वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे या वादावरून आमने-सामने आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत नुकताच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता, ज्यामध्ये बाळासाहेब म्हणतात की, ज्या दिवशी त्यांचा पक्ष सत्तेवर येईल, त्या दिवशी त्यांनी रस्त्यावर नमाज अदा करणे बंद करण्यासोबतच मशिदीतून लाऊडस्पीकर काढले जातील. आता राज ठाकरेंच्या या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
काय आहे बाळासाहेबांच्या 'या' व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले की, “हा मूळ व्हिडिओ आहे. हे स्वस्तात नकल करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल मागे नसून अनेक पावले मागे असतात. व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमचा शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता. प्रियांका चतुर्वेदी या बाळासाहेबांच्या या व्हिडिओतून राज ठाकरेंना निशाणा साधताना दिसल्या. दरम्यान, राज ठाकरेंची भाषण करण्याची शैली बाळासाहेबांसारखीच असल्याचं बोललं जातंय. प्रियंका चतुर्वेदीने याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओत काय आहे?
राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या 36 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भगवी शाल परिधान केलेले दिसत आहेत आणि त्यांच्या मागे पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत, "ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील, कारण धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. जर आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांविना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजान झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
Loudspeaker News : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अजान भोंग्यांशिवाय, पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा काही ट्रस्टींचा निर्णय