Smart Bulletin 09 ऑक्टोबर 2022 : दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. केंद्रीय निवडणूक आयोगानं तूर्तास धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, दोन्ही गटाला सध्या शिवसेना नावही वापरता येणार नाही, कागदपत्रांच्या छाननीनंतर अंतिम निर्णय घेणार
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
2. नवीन नाव आणि पक्षचिन्हाचे विकल्प सादर करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत, दोन्ही गटानं बोलावली तातडीची बैठक
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत. दरम्यान, सोमवारी दोन्ही गटाला पक्ष चिन्ह आणि नावाचा निर्णय होणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत.
3. आज ठाकरे गटाच्या तोफा मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार, ठाण्यापासून प्रबोधन यात्रेला सुरुवात
4. उद्धव काकांनी साथ दिली तर राजकारणात येईन, शिंदेंना समर्थन देणारे जयदेव ठाकरेंचे पुत्र जयदीप यांची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. यावेळी जयदेव ठाकरे आणि निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुटुंबातील कुणीही नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. बाबांचं माहीत नाही, मी मात्र उद्धव काकांसोबतच राहणार, अशी प्रतिक्रिया जयदीप ठाकरे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. उद्धव काकांनी राजकीय जबाबदारी दिल्यास राजकारणात सुद्धा सक्रिय होईल, असेही जयदीप ठाकरे म्हणाले.
5. नाशिक बस दुर्घटनेतील 12 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली, इतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
नाशिक शहरातील भीषण बस अपघातात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटविणे कठीण झाले होते, मात्र आता बारा मृतांपैकी 08 जणांची ओळख पटविण्यात आली आहे. तर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येईल.
6. आज कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'यलो' अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. हवामान विभागानं (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगलाच पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील पालघर, जळगाव, नंदूरबार, धुळे, पुणे जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. आज कोककणसह, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.
7. आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला - वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबईकरांनो आज रविवारी लोकल रेल्वेने (Central Railway Megablock Today) प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून आज मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येत आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला - वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने (Railway) दिली.
8. काश्मीर प्रकरणी मध्यस्थाची गरज नाही, भारताने पाकिस्तानसह जर्मनीला ठणकावले
काश्मीर मुद्यावर (Kashmir Issue) तोडगा काढण्यासाठी तिसऱ्या पक्षाची, मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने (United Nations) पुढाकार घ्यावा, असे वक्तव्य पाकिस्तान (Pakistan) आणि जर्मनीने (Germany) म्हटले होते. भारताने त्यावर आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी (Terrorism in Kashmir) कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करणे अधिक गरजेचे आहे, असेही भारताने म्हटले आहे.
9. यंदा दिवळीत फटाके महागण्याची चिन्ह, कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं व्यापारीही संकटात
यंदा दिवळीत फटाके महागण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं व्यापारीही संकटात सापडला यामुळे फटाके महागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
10. नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोमल वाकळेनं जिंकलं सुवर्णपदक
National Games of India 2022: गुजरात (Gujarat) येथे झालेल्या 36 व्या नॅशनल गेम्समध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Weightlifting Game) महाराष्ट्राच्या (Maharashtra) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोमल वाकळे (Komal Wakale) हिला सुवर्णपदक मिळालंय.