दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. वेळेआधी पाऊस येण्याचा अंदाज वर्तवणारं हवामान विभाग पुन्हा तोंडघशी, मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला, महाराष्ट्रातल्या आगमनासाठी 12 जूनचा नवा मुहूर्त


2. जोपपर्यंत 80 ते 100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, अन्यथा दुबार पेरणीचं संकट, कृषीमंत्री दादा भुसेंचं शेतकऱ्यांना आवाहन


हवामान खात्याच्या वतीनं यंदाच्या वर्षी मान्सून (Monsoon) लवकर धडक देणार, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण अद्याप राज्यात मान्सूनचा पत्ता नाही. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 


यंदा मान्सून उशीरा येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, किमान 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करु नये, असं दादा भुसेंनी सांगितलं आहे. पाऊस पुरेसा झाला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येईल, त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काही काळ पावसाची वाट पाहावी, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलं करण्यात आलं आहे. 


3. मुख्यमंत्री मविआ आणि समर्थक अपक्ष आमदारांशी संवाद साधणार, राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्याचं आव्हान, हॉटेलमुक्कामी आमदारांना मतदानाचं ट्रेनिंग 


4. राज्यसभेत किंगमेकर ठरू शकणाऱ्या लहान पक्षांच्या आमदारांसाठी रस्सीखेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून गाठीभेटी, अनेक अपक्षांच्या अटी-शर्ती पूर्ततेचं आव्हान


5. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगडात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं खबरदारीचं आवाहन, यंदाची आषाढी वारी निर्बंधमुक्त असणार, शाळाही वेळेवर सुरु होणार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 07 जून 2022 : मंगळवार : एबीपी माझा



6. राज्यात तूर्त मास्कसक्ती नाही, मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजेश टोपेंची माहिती, खबरदारी म्हणून नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन


7. अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी बांधवांचा पाण्यासाठी संघर्ष, पाणीटंचाईचं वास्तव दाखवणारा व्हीडिओ सोशल मीडियावर, खासदार नवनीत राणा ट्रोल


8. धमकीप्रकरणी सलमान खानसह 4 जणांचा जबाब नोंदवला, तर वांद्रे परिसरातील 200 सीसीटीव्हींचे फुटेज पोलिसांच्या ताब्यात


9. बोरीस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम,  अविश्वास ठराव जिंकला, कोरोनाच्या काळात नियमबाह्य पार्टी केल्यानं ओढावलेलं संकट टळलं


10. अॅपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये MacBook Air आणि iOS 16 लॉन्च; iphone युजर्ससाठी पर्वणी