Rajesh Tope : राज्यासह देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली, त्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.


बूस्टर डोस मोफत नाही
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आमचे लक्ष लसीकरणावर आहे. विशेषत: बूस्टर डोसकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. खबरदारीचा डोस असल्याने राज्य ते मोफत देणार नाही. दरम्यान, सध्या राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मंत्रिमंडळात याबाबत काल सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मुंबई आणि ठाणेसह राज्यातील 9 जिल्हे आहेत. ज्यात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले


..तर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय राहणार नाही - पालकमंत्री, मुंबई


सध्या रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आम्ही निर्बंध लागू करत नाही, पण रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसले तर आमच्याकडे निर्बंध लादण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत.


राज्य मंत्रिमंडळाची बैठक, 'त्या' जिल्ह्यांबाबत खबरदारी घेणार


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय आणि त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं बैठकीत चर्चा झाली. गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.  गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे हे पात जिल्हे  नवे हॉटस्पॉट. ठरत आहेत. 4.31 % लक्षणे असलेले रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.  95 % रुग्णांना लक्षणे नाहीत तर 1.04% रुग्ण  गंभीर आहेत.


गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणियरित्या वाढली


गेला आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84 % ची वाढ 


सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पहिले पाच जिल्हे


पालघर- 35०% वाढ
ठाणे-191% वाढ 
मुंबई- 135% वाढ 
रायगड- 130% वाढ 
पुणे- 50% वाढ


सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पहिले पाच जिल्हे


मुंबई



  • 30 मे ते 5 जून - 4880 रुग्ण

  • 23 ते 29 मे - 2070  रुग्ण

  • 135.75 % वाढ 


ठाणे



  • 30 मे ते 5 जून - 1245 रुग्ण

  • 23 ते 29 मे - 427  रुग्ण

  • 191.57 % वाढ


पुणे



  • 30 मे ते 5 जून - 538 रुग्ण 

  • 23 मे ते 29 मे - 357 रुग्ण 

  • 50.70 % वाढ 


रायगड



  • 30  मे ते 5 जून - 244  रुग्ण

  • 23  ते 29 मे - 106 रुग्ण

  • 130.19 % वाढ


पालघर 



  • 30  मे ते 5 जून - 144 नवे रुग्ण

  • 23 ते 29 मे -  32  नवे रुग्ण 

  • 350.00 % वाढ


संबंधित बातम्या


कोरोनाचा पुन्हा वाढतोय धोका, बूस्टर डोसमध्ये भारत मागे का? जाणून घ्या काय आहे कारण


Mumbai Corona Update : सोमवारी मुंबईत 676 नव्या रुग्णांची भर, 5238 सक्रिय रुग्ण