कोल्हापूर : "सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासावा," असं प्रत्त्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. तसंच "राज ठाकरे तीन ते चार महिने भूमिगत असतात आणि एखादं लेक्चर देतात," असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.


शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना, राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला शरद पवार यांनी आज उत्तर दिलं.


सर्व जातीचा लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची भूमिका राष्ट्रवादीची आजही आणि उद्याही राहिल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे, असंही पवार म्हणाले.


राज ठाकरे यांचा पवारांवर आरोप
1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले.  बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राह्मण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची, असेही राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मुंबईतील शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही," असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.


संबंधित बातम्या



 



Sharad Pawar : राष्ट्रवादी विविध जातीपातींंना घेऊन जाणारा पक्ष, राज यांनी इतिहास तपासावा