दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. औरंगाबादच्या मराठवाडा संस्कृतिक मैदानात राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या 15 अटी, सुरक्षेसाठी 3 हजार पोलीस तैनात
2. 4 जून रोजी राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार का? चर्चांना उधाण, शरयू नदीची आरती करण्याची देखील शक्यता
3. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, मुंबई सत्र न्यायालयात आज राज्य सरकार देणार उत्तर
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी 26 एप्रिल रोजी राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान, आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यामुळे, आज राणा दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात राज्य सरकार उत्तर देणार आहे. दरम्यान, सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीनं कोठडीत आहे. खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्यानं जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याआधी त्यांनी जामिनासाठी न्यायदंडाधिकारी कोर्टात याचिका केली होती. मात्र राजद्रोहाच्या आरोपांसाठी जामीन देण्याचा अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाही. त्यामुळे वेळ वाया न घालवता ही याचिका त्यांनी मागे घेतली आणि राणा दाम्पत्यानं थेट सत्र न्यायालय गाठलं. 26 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. याआधी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्याची एफआयआर रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली होती.
4. शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. तसेच, चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या पाच संस्थांवर ईडीनं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीनं भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या होत्या. ईडीच्या या कारवाईवर बोलताना भाजपनं जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, असं भावना गवळी म्हणाल्या होत्या. माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा, अशी मागणीही त्यावेळी खासदार भावना गवळी यांनी केली होती.
5. फोन टॅपिंग प्रकरणातील चार्जशीटमध्ये खळबळजनक दावा, संजय राऊतांचा फोन संतोष रहाटे नावानं टॅप होत होता, रश्मी शुक्ला यांनाही माहिती असल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा दावा
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 29 एप्रिल 2022 : शुक्रवार
6. खार पोलीस ठाण्याबाहेरील हल्ला प्रकरणी किरीट सोमय्या यांची मुंबई उच्च न्याायलयात जनहित याचिका, प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
7. युसूफ लकडावालाचे लाभार्थी कोण आहेत? लकडावालाचे आघाडी सरकारच्या काही नेत्यांसोबत फोटो ट्वीट करत मोहीत कंबोज यांचा सवाल
8. विदर्भात 30 एप्रिलपासून 2 मे पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
9. कोल्हापूरनंतर सिंधुदुर्गताही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, आंबा बागयतदारांचं नुकसान होण्याची शक्यता, बळीराजा चिंतेत
10. बॉक्स ऑफिसवर आज चार चित्रपटांची मेजवानी,अजय देवगणचा रनवे-34 आणि टायगर श्रॉफचा हिरोपंती-2 प्रदर्शत होणार,अमृता खानविलकरच्या चंद्रमुखीचीही चर्चा तर दाक्षिणात्य चित्रपट आचार्यकडेही चित्रपट प्रेमींच्या नजरा