1. देशभरातले वीज कर्मचारी, एसबीआय वगळून राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी आणि राष्ट्रीय कर्मचारी संघटनांची संपाची हाक, खासगीकरणाच्या धोरणाला विरोध, महाराष्ट्र सरकारचा मेस्माचा इशारा


2. एक एप्रिलपासून जीएसटी, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड आणि पोस्ट ऑफिसच्या नियमांत मोठे बदल, बदललेली नियमावली एबीपी माझावर


3. दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर साडे आठ हजार शाळातील शिक्षकांचा बहिष्कार, 100 टक्के अनुदान आणि सेवा संरक्षणासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा पवित्रा


बातमी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी 100 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.  विना अनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळावं आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण मिळावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.  


4. पुढचे चार दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसनं वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज


5. भाजपचा पाठिंबा असलेल्या व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांवर अत्याचार, काश्मीर फाईल्स सिनेमावर शरद पवारांचं वक्तव्य


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 28 मार्च 2022 : सोमवार



6. राणे-शिवसेना वाद शिगेला पोहचला असतानाच आदित्य ठाकरे तीन दिवस कोकण दौऱ्यावर, नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात सभा


 राणे आणि शिवसेना यांच्यातलं नातं कसं आहे हे काही सांगण्यासाठी जाणकार किंवा ज्योतिषी असण्याची गरज नाही. राणे कुटुंबियांनी विविध मुद्द्यांवरुन सातत्याने राज्याचे पर्यावरण तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता राणेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार आहेत, त्यामुळे तिथे ते काय बोलणार याची उत्सुकता असेल.


7. पुढचे चार दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसनं वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज


8. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका, सर्वोत्कृष्ट छायांकनासह ६ पुरस्कारांवर कोरलं नाव, सोहळ्यात जेम्स बॉन्डच्या आठवणींना उजाळा


9. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गांगुली आणि जय शाहांवर आरोप, काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ नये म्हणून दबाव टाकल्याचा आरोप


10. आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात दिल्लीकडून मुंबईचा पराभव, तर अतितटीच्या लढतीत पंजाबची बंगलोरवर मात, आज गुजरात-लखनौ आमनेसामने