दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मुख्यमंत्र्यांचा कालचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्यानं चर्चांना उधाण, तर राज्यपाल कोश्यारी आज दिल्लीत, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राष्ट्रवादीची टीका
2. शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? अजित पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सवाल, आज अजितदादा विदर्भ दौऱ्यावर
3. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी जोराचा पाऊस, नदी नाल्यांना पूर, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
4.लातूरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार वाहून गेला, एक जण बचावला
5. आरेमधील कारशेडविरोधात वनशक्ती संस्थेची सर्वोच्च न्यायालयात धाव, कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी, सुनावणी घेण्यास न्यायालयाचा हिरवा कंदील
6. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान, लवकरच घरोघरी स्मार्ट वीज मीटर बसवणार, तर पोलिसांच्या घरासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश
7. फसवणूकप्रकरणी 14 वर्षांपासून फरार आरोपीचं नांदेडमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र, सरकारी नोकरीच्या बहाण्याने 51 लाखांचा गंडा, आरोपीला 4 दिवसांची कोठडी
8.सुबोध जयस्वाल यांची सीबीआय संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीरच, केंद्र सरकारचा न्यायालयात प्रतिज्ञापत्रातून माहिती
9. बंगालमधल्या शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी आतापर्यंत 50 कोटींची रक्कम जप्त, दुसऱ्यांदा केलेल्या छापेमारीत अभिनेत्री अर्पिताच्या घरातून 29 कोटींची रोख आणि 5 किलो सोनं हस्तगत
10. भारताकडून वेस्ट इंडिजचा 119 धावांनी धुव्वा, 39 वर्षांनंतर विंडीजला त्यांच्याच घरात व्हाईट वॉश देत गब्बर सेनेनं घडवला इतिहास, गिल-चहल विजयाचे शिल्पकार
भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 3ृ0 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे भारत 36 षटकंच खेळू शकला. यात 225 धावा भारताने केल्या. ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे.