मेट्रो 2-ए आणि मेट्रो 7चा पहिला टप्पा 10दिवसांत सेवेत, मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र, पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान आणि सुकर होणार


दिग्विजय सिंह यांच्यासह 6 जणांना एक वर्षासाठी सश्रम कारावास, 11 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात शिक्षा


पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; 6 दिवसांतील पाचवी वाढ, पेट्रोल 52 तर डिझेल 57 पैशांनी कडाडलं


आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोलमध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत. रविवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. रविवारी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागलं होतं. तर त्यापूर्वी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 82 तर डिझेल 81 प्रति लिटरने वधारणार आहे


कोरोनामुळं ब्रेक लागलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्ववत, चीन सोडून 40 देशांच्या विमान कंपन्यांसाठी भारताचं आकाश मोकळं


मुलांनी मन वळवल्यानंतर सिनेसृष्टीला राम राम करण्याचा विचार सोडून दिला, आमीर खानचं वक्तव्य, तर बॉलिवूडमधल्या वर्णभेदावर नवाजुद्दीनचं बोट


परबांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या भाजप नेत्यांच्या अटकेमुळं काल दिवसभर राजकीय नाट्य, उशीरा रात्री पोलिसांकडून सुटका रा


मेंढपाळाच्या हस्ते सांगलीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्याचा पडळकरांचा निर्धार, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटनास तीव्र विरोध


राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता


रविवारचा मुहूर्त साधत आयपीएलमध्ये डबल धमाका, मुंबई दिल्लीशी भिडणार तर पंजाब किंग आणि आरसीबी आमनेसामने, चेन्नईला पराभूत करुन केकेआरची विजयी सलामी


विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात, शेफाली वर्मासह स्मृती मानधनाची शानदार खेळी