Vinayak Raut : "तक्रार करणं तुमचा अधिकार असून केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्याचे काम प्रशासनाचे आहे. प्रशासन दोषींवर कारवाई करेल. परंतु, तुम्ही स्वतःच्या हातात कायदा घेत हातोडा घेऊन दापोलीला निघाला आहात. ते तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला शोभणारं कृत्य आहे का? भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) ज्या सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असे आवाहन करत, तुम्ही कायदा हातात घेऊ शकता का? आणि सोमय्यांची ही कृती भाजपला मान्य आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर होते. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून सोमय्या आज दापोलीत दाखल झाले होते. सोमय्या यांच्या या दौऱ्यावरू विनायक राऊत यांनी भापवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "कोकणामध्ये सध्या सणासुदीचे दिवस आहेत. आज पालख्या घरोघरी जातात. शिवाय गावागावांमध्ये पालक्या फिरत आहेत. त्यामुळे कोकणात आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षाच्या कोरोना महामारीनंतर कोकणामध्ये हे वातावरण निर्माण झालं आहे. परंतु, अशा, वेळी कोकणी लोकांच्या आनंदात विरजण टाकायचं आणि राडा निर्माण करणे भाजपला मान्य आहे का? याच उत्तर त्यांनी द्यावं."
विनायक राऊत म्हणाले, " किरीट सोमय्या यांना मारण्याचा कट केला असेल तर अजून एक पेन ड्राईव्ह पोलिसांकडे आणि केंद्राच्या एजन्सीकडे द्या व त्याची शहानिशा करून घ्या. उगाच कांगावा करायचा की, मला मारण्याचा कट करत आहेत. खरच मारण्याचा कट असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला कोणी अडवले नाही. परंतु, केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. स्वतः बद्दल सहानुभूती निर्माण करायची आणि कायद्याचा भंग करून पुन्हा आरोळ्या ठोकण्याचा हा धंदा त्यांनी सोडून द्यावा."
महत्वाच्या बातम्या