Top 10 Maharashtra Marathi News :दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. इंधन दरात मागील 5 दिवसातील चौथी वाढ, पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागणार
2. भाजप नेते किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना, परिवहनमंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडण्याचा चंग तर सोमय्यांना रोखण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा निर्धार
3. कुटुंबाची बदनामी आणि नवाब मलिकांच्या अटकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, तर मलिकांच्या समर्थनावरुन फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
4. निवडणुका असलेल्या ठिकाणीच केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई का? एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचा सवाल
5. महाराष्ट्रात मी मंत्री असतो तर मुंबईत 3 मजली उड्डाणपूल बांधला असता, वाहतूक कोंडीमुळं उद्विग्न झालेल्या नितीन गडकरींची एबीपी नेटवर्कच्या कार्यक्रमात प्रतिक्रिया
6. 33 लाखांचं वीजबिल थकवणाऱ्या नंदुरबारमधल्या नवापूर पालिकेची वीज कापली, तर २३ लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या महावितरणचं कार्यालय पालिकेकडून सील
7. मुंबई नजीकच्या विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या प्राचार्या बतुल हमीद यांचा राजीनामा, हिजाब प्रकरणानंतर विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप, कॉलेज प्रशासनाकडून इन्कार
8. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरच्या संचालकपदावरुन अनिल अंबानी पायउतार, सेबीनं दिलेल्या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी
9. ISRO लवकरच लाँच करणार चांद्रयान-3, यावेळी नक्कीच यश मिळणार डॉ. सिवन यांना विश्वास
इस्रो (ISRO) लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू आहे. डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. यावेळी आम्हाला आमच्या मिशनमध्ये नक्कीच यश मिळेल, असेही ते म्हणाले. सिवन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चांद्रयान-3 मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल.
10. आजपासून आयपीएलच्या 15व्या मोसमाला सुरुवात, चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईड रायडरमध्ये सलामीचा सामना, चेन्नईच्या नेतृत्त्वाची कमान जाडेजाकडे तर कोलकाताची श्रेयस अय्यरकडे