Nitin Gadkari Petrol-Diesel Price Hike: दिवसंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या पाच दिवसांत देशात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांची वाढ झाली आहे.  वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत वक्तव्य केलं.
 
रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या 


एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. भारतात 80 टक्के तेल आयात केले जाते. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर हहोत आहे. युद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या असून, त्याबाबत आपण काहीही करु शकत नाही. स्वदेशी ऊर्जा निर्मितीक्षमता विकसीत करण्याच्या गरजेवर भर देत इंधन स्वतः तयार करण्याची गरज असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. 


आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली असून, त्यानंतर राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत 98 रुपये 61 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 89 रुपये 87 पैशांवर पोहोचली आहे. कालही राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली होती. चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर मंगळवारी या किमतींमध्ये प्रथमच बदल वाढ झाली आहे. त्यानंतर गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा इंधन महाग झाले आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मागील पाच दिवसांतील ही चौथी वाढ आहे. पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. मागील पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.29 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 पैसे झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 98.61 रुपये आणि डिझेलचा दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.