दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.




1. ज्ञानवापी वादावर शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल, महागाईवरुन लक्ष हटवण्याचा केंद्राचा प्रयत्न, केंद्राकडून देशातील बंधुभाव संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचाही आरोप


2. मे अखेरीस ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळेल, मंत्री हसन मुश्रीफांची माहिती, जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकार डेटा कोर्टात सादर करणार


3. शिवसेनेनं राज्यसभेसाठी संजय पवार यांचं नाव निश्चित केल्यानंतर संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम, राजेंसाठी कार्यकर्ते आक्रमक


4. गेल्या 2 दिवसांपासून श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबलेला मान्सून पुढे सरकला, कोकण, विदर्भासह गोव्यात पावसाचा अंदाज तर शिमल्यात पावसामुळे पर्यटक सुखावले


5. तेरा बोगस लोन अॅप्सची माहिती सायबर पोलिसांच्या हाती, अॅप्स  डिलीट करण्यासाठी गुगल प्ले स्टोरला पत्र, फसवणुकीच्या एक हजार 829 तक्रारी


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 25 मे 2022 : बुधवार : एबीपी माझा


6. नवी मुंबई पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, स्थानिक नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा, गणेश नाईकांचं वर्चस्व संपुष्टात आणण्याचा चंग


7. सोयाबीनसह सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क दोन वर्षांसाठी हटवलं, मोदी सरकारचा निर्णय, खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता


8. आता साखरही स्वस्त होणार, साखरेच्या निर्यातीवर 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय 


वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर (Sugar Export) बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. त्यामुळे वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे साखर स्वस्त होणार आहे. मात्र या निर्णयामुळे साखर कारखान्यांचं अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे. 


बेलगाम महागाई आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकार सातत्यानं कृती करत आहे. गेल्या दहा दिवसांत एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोलच्या किमती (Petrol Price) कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात यासारख्या मोठ्या घोषणांचा समावेश आहे. महागाईच्या गर्तेतही साखरेचा गोडवा कायम ठेवण्यासाठी काल (मंगळवारी) मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.  


9. अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत अंदाधुंद गोळीबार, गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर तरुण ठार


10. आयपीएलमध्ये नवख्या गुजरातची फायनलमध्ये धडक, राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय, मिलर विजयाचा शिल्पकार