दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. बाळासाहेबांचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवा, ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान, फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचाही समाचार, सदस्य नोंदणी वाढवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना
2. पक्षचिन्हासाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार, निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी, 8 तारखेपर्यंत पुरावे सादर करण्यासाठी आयोगाची दोन्ही गटांना नोटीस
3. द्रौपदी मुर्मू यांना सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाची शपथ देणार, शपथविधी सोहळ्याआधी मुर्मूंकडून राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली
4. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीसाठी वर्णनात्मक परीक्षा घेण्यास विरोध, परीक्षेसाठी कमी कालावधी उरल्यानं विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात
5. बीएच्या परीक्षेत आक्षेपार्ह प्रश्न! मुक्त विद्यापीठाने माफी मागावी; अंधश्रध्दा निर्मूलन समिती आक्रमक
6. पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात विजांच्या कडकडाटासह कोसळणार!
Maharashtra Rains : येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे. पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Update) वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
7. पूर्व विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा; सुनिल केदारांचा दावा
8. कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या प्रगती एक्सप्रेसचं आज पुनःश्च हरीओम, विस्टा डोम कोचसह प्रगती एक्स्प्रेस आज पुन्हा रुळावर
9. चीनची भारताच्या पूर्व लडाख परिसरात घुसखोरी, चीनचं लढाऊ विमान भारताच्या 10 किलोमीटरपर्यंत हद्दीत शिरल्याची माहिती, भारतीय वायुसेना अलर्ट मोडवर
10. . वेस्ट इंडिजविरोधातला दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका भारताच्या खिशात, तडाखेबंद खेळी करणारा अक्षर पटेल सामनावीर