दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेल्या मान्सूनचा श्रीलंकेच्या वेशीवरच खोळंबा, हवामान खात्यानं भारतातल्या प्रवेशासाठी दिलेला 27 मेचा मुहूर्त हुकण्याची शक्यता
2. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, चंद्रकांत खैरेंचं नाव आघाडीवर, संभाजीराजेंच्या भूमिकेचाही सस्पेन्स कायम
3. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे खासदार बृजभूषण यांचे शरद पवारांसोबतचे फोटो मनसेकडून ट्वीट, विरोधासाठी रसद पुरवल्याचा अप्रत्यक्ष आरोप
4. औरंगाबादमधील भाजपचा मोर्चा म्हणजे उंटावरचा जलआक्रोश, सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण, तर कालच्या मोर्चात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
5. टोमॅटोचे दर दोन आठवड्यात दुप्पट, दक्षिणेकडील राज्यात टोमॅटोचे दर शंभरीपार तर महाराष्ट्रातील अनेक शहरांत ऐंशीपार, अतिउष्णता आणि मान्सूनपूर्व सरींचा फटका
सध्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर त्याठिकाणी एक किलो टोमॅटोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. दर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनपूर्व पावसामुळं टोमॅटोची काढणी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर वाढले आहेत.
दरम्यान, जास्त उष्णतेमुळं उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा कमी टोमॅटोची आवक आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 24 मे 2022 : मंगळवार : एबीपी माझा
6. मंकीपॉक्सबाबत केंद्र सरकारच्या सूचनांचं तंतोतंत पालन करु, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती तर परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार तपासणी
7. मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु, 31 मे रोजी आरक्षण सोडत तर 13 जून रोजी आरक्षण जाहीर करणार
8. पुण्यातल्या दोन दर्ग्यांबाबत मनसेचा मोठा दावा, पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्गा, मनसेच्या अजय शिंदेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण
9. कुतूबमिनार परिसरात हिंदूंना पूजेच्या अधिकारासाठी दाखल याचिकेवर आज सुनावणी, दिल्लीच्या साकेत कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष
10. क्वाड परिषदेत चीनविरोधात देशांची मोट, बायडेन यांच्या संकल्पनेतील करारावर स्वाक्षऱ्या, तैवानकडे वक्रदृष्टी न टाकण्याचाही इशारा