दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. ठाकरे आणि शिंदे गटातला वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात, कागदोपत्री पुरावे सादर करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत
 
2. 13 महानगरपालिकांसाठी ओबीसी आरक्षणासह नव्याने सोडत, अनुसूचित जाती-जमाती वर्गासाठी आरक्षण कायम, तर सर्वसाधारण महिलांच्या आरक्षणात फेरबदल
 
3. प्रदेश कार्यकारणीच्या निमित्तानं भाजपचं मुंबईलगतच्या पनवेलमध्ये मंथन, प्रमुख नेत्यांसह 800 पदाधिकारी उपस्थित राहणार


4. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, परदेशी चलनासह 20 कोटींचं घबाड जप्त, 2 मंत्र्यांच्या घरासह 13 ठिकाणी छापे


5. चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट; पुण्यात 2 रुग्णांची नोंद


6. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा


7. पालघरच्या भाटीपाड्यातील महिला रुग्णाला झोळीत बांधुन रुग्णालयापर्यंत पोहोचवलं..रुग्णालयात जाण्यासाठी करावी लागतेय जीवघेणी कसरत.


8.'देशात NRC लागू झाली तर अर्ध्याहून अधिक भटके विमुक्त कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जातील', ज्येष्ठ नेते बाळासाहेब रेणकेंचं वक्तव्य


9. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा, 'गोष्ट एका पैठणीची' उत्कृष्ट मराठी सिनेमा तर गोदाकाठ आणि अवांछितसाठी किशोर कदम यांना विशेष पुरस्कार, राहुल देशपांडे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक


10.टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची विजयी सुरुवात, रोमहर्षक सामन्यात तीन धावांनी विजय


India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दिलेली दमदार झुंज सर्वांच्याच स्मरणात राहील. वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली, पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीज सामना जिंकू शकले नाहीत. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले