1. पुण्यात आज होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला 13 अटी-शर्तींची लक्ष्मणरेखा,  अयोध्या दौरा रद्द करण्याचं कारण समजणार, भोंग्याविरोधातील आंदोलनाची पुढची दिशाही ठरणार


2. पेट्रोल साडेनऊ आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त, केंद्र सरकारचा मोठा दिलासा, इंधनांच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय 


महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा कपात (Petrol Diesel Price) केली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol Price) 9.50 रुपयांनी आणि डिझेल (Diesel Price) 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. 


केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत केलेल्या कपातीनंतर देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपयांवरुन 95.91 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल 96.67 रुपयांवरुन 89.67 रुपयांवर पोहोचलं आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 120.51 रुपयांवरून 111.01 रुपये प्रति लिटर झाले आहेत. तसेच, डिझेलची किंमत 104.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रति लिटर होणार आहे. 


3. घरगुती गॅस सिलिंडरसाठी पुन्हा सबसीडी लागू, वर्षाला 12 सिलिंडरवर प्रत्येकी 200 रुपये सबसिडी


4. आधी किंमती वाढवून नंतर कमी करण्याचा दिखावा नको, महाराष्ट्राला इंधनाचे दर कमी करण्याचं आवाहन करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांचं उत्तर, आकड्यांवर बोट ठेवत काँग्रेसचाही केंद्रावर पलटवार


5. मान्सून अरबी समुद्रात दाखल, येत्या 2 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज, तर 5 जूनला कोकणात पोहोचण्याची शक्यता


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 22 मे 2022 : रविवार



6. पक्षातील काही सहकाऱ्यांच्या विधानांमुळे ब्राह्मण संघटनांमध्ये अस्वस्थता, चर्चेनंतर पवारांची माहिती, तर जाती-धर्माबद्दल विधानं करु नये यासाठी समज देणार पवारांचं स्पष्टीकरण


7. कांजूर मार्ग येथील जेव्हीएलआर उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण, आज सकाळी सहा वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी खुला, वाहतूक कोंडीतून सुटका


8. दादरच्या वनिता समाज सभागृहात 'आम्र महोत्सव', 450 रुपये शुल्क भरून पोटभर आमरस पुरी खाता येणार


9. एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीच्या हत्येमुळं औरंगाबाद हादरलं, देवगिरी कॉलेज परिसरातून फरफटत नेत विद्यार्थिनीला भोसकलं


10. मुंबई इंडियन्सनं दिल्लीला हरवल्यामुळं आरसीबीला फायदा, प्ले-ऑफमधलं बंगळुरुचं तिकीट कन्फर्म