दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. काही तासांत मान्सून अंदमान, निकोबार आणि बंगालच्या उपसागरात दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांत वादळी-वाऱ्यासह पावसाची शक्यता


2. उद्धव ठाकरेंच्या सत्तेचा ढाचा खाली आणल्याशिवाय राहणार नाही, मास्टरसभेला उत्तर देत फडणवीसांचा इशारा, बाबरी पाडायला गेल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार


3. गुरु शिष्याचं नातं सांगण्यात काही अर्थ नाही, पवारांपुढे नाक घासून मुख्यमंत्री झाल्याची टीका करणाऱ्या फडणवीसांना ठाकरेंचं उत्तर


4. काँग्रेसनं पाठिंबा काढू नये म्हणून मुख्यमंत्री औरंगाबादचं नामांतर टाळत असल्याचा फडणवीसांचा आरोप, संभाजीनगरवरुन चंद्रकांत खैरेंचाही खरपूस समाचार


5. काँग्रेसमध्ये 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना 50 टक्के पदं, उदयपूरमधल्या शिबिरात मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवर  भाजपला हरवण्यासाठी प्रादेशिक पक्ष असमर्थ असल्याचं राहुल गांधींचं मत.


पाहा व्हिडीओ :  स्मार्ट बुलेटिन : 16 मे 2022 : सोमवार



6. नाशिक महापालिकेत 122 ऐवजी 133 नगरसेवक, प्रभागांची संख्या 44 वर, ओबीसी आरक्षण नसल्यानं खुल्या प्रवर्गासाठी 104 जागा


7. भिवंडीत तबेल्यातील 22 म्हशींवर सुऱ्यानं वार, 7 म्हशींचा मृत्यू, 15 गंभीर जखमी


8.  अभिनेत्री केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही का? सुनावणीदरम्यान केतकीचा सवाल


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.  केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली.  गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत. 


9. धर्मवीर सिनेमाचा शेवट पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं, प्रसाद ओकच्या अभियनाचं तोंडभरून कौतुक


'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी आनंद दिघे (Anand Dighe) यांचा प्रवास पडद्यावर उभा केला आहे. अलिकडेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. त्यांनी पत्नीसह चित्रपट पाहिला. चित्रपटातील आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळलं.


10. थॉमस-उबेर चषक बडमिंटनमध्ये भारताचं ऐतिहासिक यश; 73 वर्षांनी भारताकडे थॉमस-उबेर चषक, फायनलमध्ये भारतीय संघाकडून इंडोनेशियाचा धुव्वा