1. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाणे-रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षाही रद्द, पुणे-नवी मुंबईतील खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना


पालघरमध्ये (Palghar) वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. यासर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं कामगार अडकले होते. अखेर तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल (बुधवारी) पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात काही कामगार अडकले होते. मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्यानं ते आडकून पडले आहेत. हे सर्व कामगार गेल्या 15 तासांपासून अडकून पडले होते. वैतरणा नदी पात्रात अडकलेल्या 10 कामगारांची 15 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे. 


2. कोकणातल्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, पंचगंगा-कृष्णेच्या पातळीतही मोठी वाढ, आजही राज्यभर मुसळधारेचा अंदाज


3. पालघरमधील वैतरणा नदीत अडकलेल्या 10 कामगारांची सुखरुप सुटका, तब्बल 15 तासांनी कामगारांना वाचवण्यात NDRF ला यश 


4. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस, गुजरातसह महाराष्ट्रात रेड अलर्ट; तर कर्नाटक, मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट


5. पहिला फोन कुणी करायचा यावरुन युतीचा निर्णय खोळंबला, शिंदे गटाच्या केसरकरांचं वक्तव्य, उद्धव ठाकरे आणि भाजपात मानापमान नाट्य सुरु असल्याची चर्चा


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 14 जुलै 2022 : गुरुवार



6. शिंदेंच्या शपथविधीला बारा दिवस उलटूनही मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी नसल्याची तक्रार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याही रखडल्या


7. आज मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंना भेटणार का याची उत्सुकता शिगेला, मुर्मूंची हॉटेल लीलामध्ये शिंदे गटासोबत बैठक होणार


8. पुढचे 75 दिवस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत, 15 जुलैपासून अंमलबजावणी, केंद्राचा निर्णय


9. मुंबई लगतच्या पालघरमध्ये झिकाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ, डहाणूमध्ये सात वर्षीय मुलीला लागण


10. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही आर्थिक संकट; महागाई 40 वर्षातील विक्रमी पातळीवर, भारतावर होणार मोठा परिणाम