दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 


1.  पहाटेपासून संततधार सुरु असल्यानं मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचलं, राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन


2. आर्थिक दुर्बल घटकातंर्गत सरकारी नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सलग सुनावणी, 50 टक्क्याच्या मर्यादेवर बोट ठेवत 30 याचिका


3. देशद्रोह्याचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचा हस्तक होणं चांगलं, एकनाथ शिंदेंचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा, तर दोन मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचाही समाचार


4. दसरा मेळाव्याबाबत एकनाथ शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्कचं मैदान न मिळाल्यास इतर जागांची चाचपणी करणार, तूर्तास बीकेसी मैदानाचा पर्याय 


शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यावरुन शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) यांच्या सुरु झालेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक जवळ आला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटानं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान काल (सोमवारी) शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? हे पहावं लागेल. दरम्यान मुंबई महापालिकेनं दोन्ही गटाच्या अर्जाची छाननी सुरु आहे. आणि आयुक्त कुणाच्या बाजूनं निर्णय देतात हे पहावं लागेल.


5. लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळणार, कालच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, लम्पीमुळे देशभरात हजारो जनावरांचा मृत्यू


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 सप्टेंबर 2022 : मंगळवार



6. ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी घेण्यास कोर्ट तयार, 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार, वाराणसी जिल्हा कोर्टाचा निर्णय


7. भगवान गडावर दसरा मेळावा घेणार, मुंडे घराण्याची सून असल्याचा दावा करत करुणा शर्मांची घोषणा, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि महंतांच्या भूमिकेची प्रतीक्षा


दसरा मेळाव्याच्या राजकारणात आता करुणा शर्मांनी उडी घेतली आहे. मी वंजारी समाजाची सून आहे, भगवानगडावर दसरा मेळावा मी पुन्हा सुरु करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


8. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत शिवसेना एकटी पडण्याची शक्यता, आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे आणि शेलार उपस्थित राहणार


9. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईट्समुळे अनेकांना दृष्टीदोष, 60 हून अधिक जणांची डॉक्टरकडे धाव


10. ताजमहालच्या दुप्पट आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं, आज पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता