दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. शरद पवार भाषणात शिवरायांचं नाव का घेत नाहीत, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंचा सवाल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांवरही हल्लाबोल
2. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर, स्टँडअप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत, आव्हाडांचा टोला तर दिवा विझताना मोठा होतोय, राऊतांचा पलटवार
3. आर्थिक गुन्हे शाखेच्या समन्सनंतर सोमय्या पितापुत्र चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष, आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी जामिनासाठी हायकोर्टाचं दार ठोठावण्याची शक्यता
BJP leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी समन्सही बजावलं आहे.
4. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा सौम्य झटका, मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, सक्त विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला
5. तीन मेनंतर राजकीय दिशा जाहीर करणार, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य, कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 एप्रिल 2022 : बुधवार
6. जिथे वीजचोरी, तिथे लोडशेडिंग, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा, महाराष्ट्राला अंधारात ढकलल्याची देवेंद्र फडणवीसांची टीका
7. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांना अडकवण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव, पीडित तरुणीचा गौप्यस्फोट, चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळले
8. मुंबईसह परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर PNG साडेचार रुपयांनी महागला, मध्यरात्रीपासून नवे दर
9. साताऱ्यातल्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी राज्यभरातून कावड दाखल, मुंगी घाट आणि चेतावनी डोंगरावरून यात्रेचं स्पेशल कव्हरेज
10. हल्ल्यामुळं न्यूयॉर्क हादरलं, ब्रुकलिन सबवे स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार आणि स्फोट, 16 जण जखमी