1. खडकवासलातून विसर्ग कमी केल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासा, वाहनं काढण्यासाठी गेलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन, राज्यातल्या बहुतांश धरणातून विसर्ग, नदीकाठालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा


2. मुंबईच्या माहीम दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूण मिठी नदीत वाहून गेले, एकाचा मृत्यू, तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरुच 


मुंबईच्या (Mumbai) माहीम (Mahim) येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूण मिठी नदीत (Mithi River) वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्री माहीम खाडीवर उभं असताना एका मित्राचा पाय घसरल्यानं तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानं धाव घेतली असता तोही वाहून गेला. मध्यरात्री भरती असल्यानं अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आलं नाही. मात्र पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्याची नावं आहेत.


3. उत्तर प्रदेशातल्या बांदामध्ये रक्षाबंधनासाठी गेलेली नौका बुडाली, 4 जणांचा मृत्यू, 15 जण बेपत्ता, उत्तरेकडच्या अनेक राज्यात पावसामुळे हाहाःकार


4. पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट


सध्या राज्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देकील पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.


5. उर्जा आणि उद्योग खात्याचा निर्णय होत नसल्यामुळे खातेवाटप रखडल्याची चर्चा, शिंदे गट आणि भाजप दोन्हीही महत्त्वाच्या खात्यासाठी आग्रही


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 12 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा



6. माझी तेवढी पात्रता नाही असं त्यांना वाटतं म्हणून मंत्रिपद दिलं नसावं, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, तूर्तास पंकजा मुंडेंची संयमाची भूमिका


7. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत धुसफूस.. नियुक्तीआधी विश्वासात घ्यायला हवं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वक्तव्य


8. 3-4 वर्षांचा विलंब टाळण्यासाठी मेट्रो 3चं कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय, एमएमआरडीनं मेट्रो-6साठी कांजूरची जागा मागितल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया


9. घर खरेदीसाठी देशभर एकच कराराच्या मसुद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एकच कराराच्या मॉडेलची संकल्पना


10. गुजरातच्या जामनगरमधील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण, आगीच्या कचाट्यात सापडलेल्या सर्व 27 जणांना वाचवण्यात यश