दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून सुट्टी, तर 13 जूनला शाळा उघडणार, शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता, सुसंगती आणण्यासाठी निर्णय
2. निर्बंधमुक्तीनंतर आलेल्या चैत्री एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल, पंढरीनाथाच्या पायावर माथा टेकवता येणार, तर मूर्तींवरील वज्रलेप अल्पावधीत निघत असल्याची चर्चा
मराठी नववर्षात येणारी वारकरी संप्रदायातील पहिली यात्रा म्हणजे, चैत्री यात्रा (Chiatra Ekadashi 2022) होय. तसं मराठी जणांचा चैत्र महिना हा जत्रा आणि यात्रांचा महिना अशी ओळख असते. या महिन्यात गावोगावच्या यात्रा, जत्रा भरत असतात. या यात्रेची दुसरी ओळख म्हणजे, चैत्र यात्रेमधून 'हरी हरा भेद नाही', हा संदेश वारकरी संप्रदाय जगाला देतो. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ही वारी मोठ्या देवाची अर्थात महादेवाची असते. शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या विवाहातील महत्वाचा दिवस चैत्र शुद्ध एकादशीला असतो. त्यामुळे वारकरी या दिवशी विठुराया अर्थात हरी आणि महादेव अर्थात हर या दोघांचे दर्शन करीत असतात.
3. मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण तापलं असतांना आज राज ठाकरेंची ठाण्यात सभा, भूमिकेवरून टीका करणाऱ्यांना मनसे प्रमुख काय उत्तर देणार याची उत्सुकचा शिगेला
4. भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री जाधवांमध्ये लढत
कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.
5. किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आज नील सोमय्यांच्या जामिनावर सुनावणी, तीन दिवसांपासून नॉट रिचेबल, आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी अटकेची टांगती तलवार
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 12 एप्रिल 2022 : मंगळवार : एबीपी माझा
6. गुणरत्न सदावर्तेंचा तुरुंगातला मुक्काम वाढला, 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित, सरकारी वकिलांचा दावा
7. कोकणातील गणेशोत्सवासाठी रेल्वेचं बुकिंग 120 दिवस आधीच सुरू होणार, 28 एप्रिलपासून तिकीट बुक करता येणार
8. झारखंडच्या देवघरमध्ये रोप-वेच्या ट्रॉली धडकून अपघात, 32 जणांना वाचवण्यात यश, 3 जणांचा मृत्यू
9. आम्हाला विकासासाठी आतंकवादमुक्त, शांती आणि स्थैर्य हवंय, पाकिस्तानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफांना शुभेच्छा देताना मोदींचं ट्वीट
10. पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदींना, राहुल देशपांडे यांना यंदाचा मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, 24 एप्रिलला पुरस्काराचं वितरण होणार