दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा तर सांगलीत कृष्णेच्या पातळीत वाढ, विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा, मुंबईला यलो अलर्ट


गेले दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा धुमाकूळ आहे. कोल्हापुरातही पावसाची संततधार असल्यानं पंचंगगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय. पंचगंगेची पातळी 40 फूटांवर गेलीय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडलीय. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणही शंभर टक्के भरलंय. त्यामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसानं गगनबावडा घाटातून कोकणात जाणारी वाहतूक सध्या बंद ठेवलेय. लोंगे किरवे कुंबी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं ही वाहतूक बंद ठेवावी लागलेय. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5 राज्यमार्ग आणि 21 जिल्हा मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मुसळधार पावसानं शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षांची आता नवी तारीख काही दिवसात जाहीर होईल


2. गृह - अर्थ खातं फडणवीसांकडे तर नगरविकास शिंदेंकडेच राहण्याची शक्यता, इतरांच्या खातेवाटपांची उत्सुकता शिगेला, शपथविधीनंतरची आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक


3. सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये, यादीकडे आमदारांच्या नजरा, बच्चू कडू शिरसाट, शेलारांसह 15 जणांच्या नावाची चर्चा


4. संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका, राठोड मंत्री झाले तरी लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार, क्लीनचिट मिळाल्यानं राठोडांना मंत्रिपद, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया


5. 1995 नंतर पहिल्यांदाच मुंबईतल्या मराठी मंत्र्याचा शिंदे सरकारमध्ये समावेश नाही, शिवसेनेकडून सरकारवर जोरदार टीका


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 10 ऑगस्ट 2022 : बुधवार : एबीपी माझा



6. 'शिवसेना कुणाची' यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत


7. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तेजस्वी यादव बिहारचे नवे उपमुख्यमंत्री, मोदी-शाहांना दे धक्का


8. आरे कारशेडविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, कारशेडचा मार्ग मोकळा होणार की रेड सिग्नल मिळणार याकडे लक्ष


9.समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता, राजकीय घडामोडींमुळे 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकण्याची चिन्ह


10.हॉट्सअॅपवर लवकरच सायलेंटली ग्रुप लेफ्ट करण्याचं फिचर, चॅट स्क्रीन शॉट घेण्यावरही निर्बंध आणण्याच्या तयारीत, तर दोन दिवसांनीही मेसेज डिलीट करता येणार