दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



१. औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा, मनसैनिकांकडून राज यांचं जल्लोषात स्वागत, भोंगे आणि संभाजीनगरबाबत काय बोलणार याची उत्सुकता


Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : आज महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. काल राज ठाकरेंच्या प्रवासादरम्यान मनसैनिकांनी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं. काल पुण्याहून निघण्याआधी राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते.. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास 100 ते 150 पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. वाटेत राज ठाकरे यांनी वढू गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर राज यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. 




२. नकली हिंदुत्ववाद्यांची चिंता नको, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा, शरद पवारांकडूनही जोरदार टीका तर मनसेचाही पलटवार


३. राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईतल्या सोमय्या ग्राऊंडवर भाजपची बूस्टर सभा, फडणवीसांच्या उपस्थितीत पोलखोल अभियानाचा समारोप


४. मी पुन्हा नक्की येईन, एबीपी माझाच्या कट्ट्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तिन्ही पक्षांना पराभूत करणार, फडणवीसांना विश्वास


५. राज्यात तूर्तास निर्बंधांची गरज नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा दिलासा, कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास मास्क सक्तीपासून निर्बंध वाढणार
 
६. महाराष्ट्राचा 62 वा वर्धापन दिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हुतात्मा स्मारकात अभिवादन, महाराष्ट्र दिन आणि कट्ट्याच्या दशकपूर्तीनिमित्त आज दिवसभर महाकट्टा


7. 'देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचं अभूतपूर्व योगदान'; महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती कोविंद यांच्या खास शुभेच्छा


8. हापूस आंबा बागायतदाराची थेट कोकण रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी, ग्राहक कोर्टात जाण्याचा इशारा


9. रवींद्र जाडेजानं चेन्नई सुपरकिंग्सचं कर्णधारपद पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे सोपवलं, खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी निर्णय 


10. आठ सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये पहिला विजय, सूर्यकुमारच्या खेळीच्या बळावर राजस्थानचा पराभव