1. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकावलं, सीएसएमटीवर ठिय्या, वकील गुणरत्न सदावर्तेंच्या सुटकेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा
2. सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना रात्री अटक , 103 आंदोलकही पोलिसांच्या ताब्यात, सदावर्तेंवर कारवाईसाठी उशीर झाल्याची मंत्री वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
3. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आल्याची अजितदादांची प्रतिक्रिया , तर मागण्यांबाबत अनभिज्ञ असणारे एसटी कर्मचारी कसे असू शकतात? जयंत पाटलांचा सवाल
4.पोलीस विभाग कुठेतरी कमी पडला, मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल : अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.'
5. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना
6. आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स, सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश, मात्र सोमय्या पितापुत्र नॉट रिचेबल
7. पावसाच्या खेळखंडोब्यानंतर अखेर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धांना सुरुवात, आयोजकांच्या विनंतीवरुन पवारांकडून सातारा दौरा रद्द
8. अविश्वास ठरावाला सामोरं जाणाऱ्या इम्रान खान सरकारची आज संसदेत कसोटी, कालच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं
9. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरावर दरोडा, दागिन्यांसह 1.41 कोटींची चोरी
10. राहुल तेवतियानं सामना फिरवला, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय; लियाम लिव्हिंगस्टोन आक्रमक खेळी व्यर्थ