दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाची मुंबईसह अनेक ठिकाणी  हजेरी, 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट


2. ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधितांना तातडीने मदत पुरवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश


Maharashtra Rains Update: पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर (Pune Satara Raigad Nashik Ahmednagar Rains News) या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 


ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करा


ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच  मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 




 



3. मुंबईतील 1993च्या स्फोटाचा गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशा आणि रोषणाई, उदात्तीकरणावरुन भाजपचा हल्लाबोल


4. नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगीसाठी कारणीभूत ठरलेल्या प्रकरणातील तरुणी सापडली, सातारा पोलीस तरुणीला अमरावतीत आणणार


5. लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग सकाळी सहापासून तर मुखदर्शनाची रांग मध्यरात्री 12पासून बंद, विसर्जनाच्या तयारीसाठी निर्णय


6. शिर्डीत भक्तांना राहण्यासाठी हॉटेलमध्ये ओळखपत्र आणि रजिस्टरमध्ये नोंदणी न केल्यास कायदेशीर कारवाई होणार, माझाचा इम्पॅक्ट 


7. राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या पदयात्रेला सुरुवात, 3 हजार 570 किमीचा प्रवास करत 12 राज्यांत भारत जोडो यात्रा


8. सेंट्रल विस्टाच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर राजपथही होणार कर्तव्यपथ
 
9 . अॅपलकडून आयफोन 14 सीरीजचं लाँचिंग, यूजर्सना अनुभवता येणार अनेक नवे फिचर्स,


10. रोमांचक सामन्यात पाकिस्तानकडून अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव; भारताचं आशिया चषकातील आव्हान संपलं