Maharashtra School News: राज्यातील विद्यार्थ्यांच्या (Students) संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या 40 टक्के विद्यार्थ्यांना 4 आकडी संख्या वाचन येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 45 ते 50 टक्के विद्यार्थ्यांना 3 आकडी बेरीज वजाबाकी करताना अडचणी येत असल्याचं देखील राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवालातून समोर आलं आहे. 


भारत सरकारचं निपुण भारत अभियान
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर भर देण्यात आला आहे.  2026 -27 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करण्याचे लक्ष ठेवले पाहिजे या दृष्टिकोनातून भारत सरकारने निपुण भारत हे अभियान राबवले आहे. भारत सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने महाराष्ट्रातील 578 शाळेतील एकूण 5308 तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं आहे.


त्यानुसार महाराष्ट्रात तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कितपत संख्याज्ञान आहे हे या अहवालातून समोर आलं आहे. तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला संख्या वाचन, बेरीज ,वजाबाकी ,कॅलेंडर ,घड्याळ ,वेळ,वस्तूचे आकारमान ,गुणाकार ,भागाकार कितपत जमते किंवा कळते हे का सर्वेक्षणातून जाणून घेतलं आहे. 


या सर्वेक्षण अहवालातून नेमकी काय माहिती समोर आली आहे ते जाणून घेऊयात


राज्यात तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संख्या ओळख , संख्या वाचन किती येतं?


राज्यातील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 60% विद्यार्थ्यांना चार आकडी संख्येचा वाचन करू शकतात


विद्यार्थ्यांना मोठी संख्या लहान संख्या कितपत ओळखता येते ?


57% तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चार आकडी संख्या मोठी संख्या, लहान संख्या ओळखता येते


किती टक्के विद्यार्थ्यांना तीन आकडी संख्येची बेरीज वजाबाकी करता येते ?


तिसरी शिकणाऱ्या 55% विद्यार्थ्यांना तीन आकडी संख्येची बेरीज करता येते तसेच 37 टक्के विद्यार्थ्यांना तीन आकडी संख्येची वजाबाकी करता येते


किती टक्के विद्यार्थ्यांना कॅलेंडर आणि घड्याळातील वेळ समजते ?
-तिसरी मध्ये शिकणाऱ्या 61टक्के विद्यार्थ्यांना कॅलेंडर समजते तर 54 टक्के विद्यार्थ्यांना घड्याळ कळते


किती टक्के विद्यार्थ्यांना आकारमान कळते ?
तिसरी मध्ये  शिकणाऱ्या 49% विद्यार्थ्यांना वस्तूचे आकारमान कळते


इतर महत्वाच्या बातम्या


CM Eknath Shinde : शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Supreme Court On Hijab: ड्रेसकोड असलेल्या शाळेत धार्मिक प्रथांचे पालन केले जाऊ शकते का?सुप्रीम कोर्टाचा सवाल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI