1. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठासमोर पहिली सुनावणी, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तीचं खंडपीठ गठीत 


राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आज सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. 23 ऑगस्टला याप्रकरणाची शेवटची सुनावणी झाली होती. मात्र, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात आल्या. परंतु, आता यावर आज सुनावणी सुरू होत असल्याने या प्रकरणाची दिशा स्पष्ट होणार आहे.


2. जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्या अमित शाहांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार, अमंगलमूर्तीची उपमा, शिवसेना पक्षप्रुमखांची 21 सप्टेंबरला जाहीर सभा


3. मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्यासाठी हालचाली, गणेशोत्सवादरम्यान जनसंपर्क आणि ताकद वाढवण्याचा दोन्ही गटांकडून प्रयत्न


4. कारमध्ये बसणाऱ्या सर्वांसाठी सीटबेल्ट अनिवार्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा, रस्ते अपघातात सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर मोठा निर्णय


केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.


5. हृदयाचा झटका आल्यानंतरही प्रसंगावधान दाखवत चालकानं वाचवले 25हून अधिक विद्यार्थ्यांचे प्राण, मृत्यूपूर्वी सतीश कांबळे ठरले चिमुकल्यांसाठी विघ्नहर्ता


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 07 सप्टेंबर 2022 : बुधवार



6. लालबाग राजाच्या दर्शनाला भक्तांचा उदंड प्रतिसाद, पाच दिवसात दानपेटीत अडीच कोटींचं दान जमा, सोनं, चांदीही राजाच्या दानपेटीत अर्पण


7. पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुरात पावसाच्या जोरदार सरी, उद्यापासून राज्यात मुसळधारेचा हवामान विभागाचा इशारा 


8. नॅशनल स्टॉक एक्सेंजचे माजी सीईओ रवी नारायण यांना अटक, यापूर्वी चित्रा रामकृष्ण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे तुरुंगात


9. भारत बायोटेकच्या इन्ट्रानेसल लसीच्या वापराला परवानगी,  लवकरच नाकावाटे  कोरोनावरची लस भारतीय बाजारात येणार


10. टी-20 आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये श्रीलंकेकडून भारताचा पराभव, टीम इंडियाचं मालिकेतलं आव्हान जवळपास संपुष्टात