Nitin Gadkari On Seatbelt New Rule : केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल.


सीट बेल्ट न लावल्यास इतका दंड
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.


मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाइलवर सही केली. असंही गडकरी म्हणाले.


रस्ते अपघातांचा विक्रम
गडकरी म्हणाले की, देशात वर्षभरात 500,000 रस्ते अपघातांचा विक्रम समोर आला आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटते. ते म्हणाले की 60 टक्के रस्ते अपघातांमध्ये 18-34 वयोगटातील लोकांचा समावेश आहे.


नियम काय आहे?
केंद्रीय मोटार वाहन नियम (1989) च्या कलम 138(3) नुसार कारमध्ये सीटबेल्ट प्रदान केला जातो. त्या कारमध्ये ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट बांधणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच 5 सीटर कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. ज्या 7 सीटर कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे चेहरे पुढच्या बाजूस असतात, तिथेही सीट बेल्ट लावणे आवश्यक करण्यात आले आहे.


सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर हा निर्णय
यावेळी गडकरी म्हणाले, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांची योग्य आखणी करावी, यावरही त्यांनी भर दिला आहे.


 



संबंधित बातम्या


एका स्कूटरवर आम्ही चार जण, तरुणपणी मीही मोडले नियम: नितीन गडकरी


Nitin Gadkari : कृषी विकासदर 22 टक्क्यांवर आणायचाय, त्यासाठी कृषी संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : गडकरी