दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



 


1. उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा, वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी


2. दरड कोसळण्याचं सत्र सुरू असल्यानं परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतूकीसाठी  बंद, पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


3. संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली


Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली होती.  मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रैकेट चालवत असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत होता.या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तयार  करण्यात आले होते. या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोनं मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. एसबीकडून जितेंद्र नवलानीविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. बुधवारी मुंबई हायकोर्टात  न्या. नितीन जमादार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील अॅड. अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली. जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी अधिकारी आणि सरकारी वकिलांमध्ये 5 जूलै रोजी या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. त्यामध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. एसआयटीला खंडणी आणि फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नसल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या परवानगीने ही एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे.दरम्यान, संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर शिवसेनेच्या एका नेत्याने जितेंद्र नवलानीची मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. त्यानंतर याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले. या पथकानेदेखील नवलानीला चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते.


4. महागाईत होरपळणाऱ्या जनतेला केंद्र सरकार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत, जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याची शक्यता, व्यापाऱ्यांचा विरोध


5. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा,  अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठीशी न राहिल्याची तक्रार


6. धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, शिंदे गटाचा दावा, कायदेशीर लढाईचीही तयारी, तर हिम्मत असेल तर शिवसेना सोडल्याचं जाहीर करा, विनायक राऊतांचं आव्हान


7. विधानपरिषदेमध्ये काँग्रेसच्या फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी


8. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, अभिजित पाटील गटाची निर्णायक आघाडी


9. तुकोबांची पालखी पिराची कुरोलीला मुक्कामी. तर ज्ञानोबांची पालखीचं आज तिसरं गोल रिंगण, तर सोपानदेव पालखीला आज माऊलींच्या पालखीची भेट


10. आज भारत-इंग्लंड पहिल्या ट्वेन्टी-20 सामना, रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष,  कसोटी सामन्यात खेळलेल्या विराट कोहली, जसप्रित बुमराहला विश्रांती